Megablock News : रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या मेगाब्लॉक कधी आणि कोणत्या मार्गांवर?

Share

मुंबई : रविवारी सुट्टीनिमित्त अनेक जण फिरायला जायचा प्लॅन करत असतात. पण रविवारच्या दिवशी रेल्वे मार्गांवर अनेकदा मेगाब्लॉक (Megablock) असतो. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागतं. यासाठी उद्या फिरायला घराबाहेर पडणार असाल, तर आधी मेगाब्लॉकचा अंदाज घ्या आणि मगच प्रवासाचे नियोजन करा. उद्या मध्य (Central railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे तर हार्बर (Harbour) आणि ट्रान्सहार्बर (Transharbour) मार्गावर मेगा ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर कसा असणार ब्लॉक?

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी डाऊन जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सीएसएमटी/दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादरला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक

माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गांवरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द राहतील. तसेच, बोरीवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.

दरम्यान, मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील उद्याचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी उद्या जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Recent Posts

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

1 hour ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

2 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

3 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

8 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

8 hours ago

होर्डिंग माफियांना आवर घाला!

रवींद्र तांबे दिनांक १३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ४.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील द्रुतगती…

9 hours ago