Categories: किलबिल

रूपवान की गुणवान?

Share

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

मानवी संस्कृतीत भावना व मन यांना उदंड स्थान आहे. या संस्कृतीचा एक भाग म्हणून संस्कारांना नीती, चालीरीती, मूल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कारातील सोळावा संस्कार विवाह! यासाठी दोन मने, दोन घरे जुळावी लागतात. त्यात कुंडलीही जुळवावी लागते. आतापर्यंत सुरळीत होतं, कठीण झाले आहे ते आता! लग्न टिकत नाहीत. लग्न नावाची संस्था लोप पावत चालली आहे. उद्ध्वस्त होते आहे, कोलमडते, डळमळीत होते आहे. अंधानुकरण, पाश्चात्त्य पद्धती, फॅशन, लिव्ह इन रिलेशनशिप… परिणामी घटस्फोट वाढत आहेत. समाजात पूर्वी अनिश्चल असणारे आता अविचल झाल्याने… तसेच रूपाला जास्त पारडं जड. पॅकेज किती? घरी माणसं किती? इथेच अडकतीये भारतीय विवाह संस्था.

“ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, तू काय भुललासी वरलिया रंगा!!” गुणांना गुणच नाहीत? गुण आहेत ते फक्त दिसण्याला. रंग गोरा भलताच तोरा. घरातल्यांना आदरच नाही. कस्पटासमान लेखून उंबरठ्यावरच माप ओलांडून घरातल्यांचाच कचरा करणारे संस्कार असतील! तर या पिढीकडून काय अपेक्षा असणार? तसं पाहिलं तर लग्न ही आनंदाची बाब! आयुष्यातील सर्वोच्च शिखर. तोच निर्णय, ती लॉटरी ही सुयोग्यच हवी. सद्गुणी, निर्व्यसनी, सुसंस्कारी, मनमिळावू, संवेदनशील पिढी गमावून आपण आपल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीने जुळवून घेताना तडजोड करत नाहीत. गुणांपेक्षा रूपाला महत्त्व वास्तव झाले. गुणांना महत्त्व देणं महत्त्वाचं आहे. मुलांवर खूप काही जाणिवा, संवेदना, बॉण्डिंग संस्कार आपण देतो, वेळोवेळी करत असतो तरीही घरात येणाऱ्या एक माणूस घराचं घरपण जिच्यावर अवलंबून असेल ती कशी? किंवा मिळणारा जावई कसा? यावरच परिपूर्ण घर. त्याबरोबर दोन कुटुंब, परिवार, आयुष्य, जीवन, कृतार्थता, सार्थकता प्रगती की अधोगती? प्रश्नचिन्ह आहे! हे मानसिक संतुलन कुटुंबाचं राखलं जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी समजून घेणारे एकमेकांच्या हातात हात साथसोबत, आशा, अपेक्षा, जबाबदारी, आधार, जपणूक, सहचर्य, समर्पण, भावनिक गुंतवणूक ही व्हायलाच हवी. यासाठी आपण वरवरच्या चेहऱ्याला रंगरंगोटी केली तरीही त्यांचं मन जपणारं सुंदर हृदय असलं पाहिजे. ते जिवंत असलं पाहिजे आणि निर्मळ असलं पाहिजे. हेच सौहार्द जपणारं असेल, संवेदनशील असेल, याची प्रथम खात्रीच करून घ्यावी.

देखणा चेहरा असून त्यामागे एकही गुण कामाचा नसेल, तर काय उपयोग? या हृदयात सजगता, चैतन्य, कणव, सौजन्यशीलता, संवेदना, जिवंतपणा, माया, जिव्हाळा आहे का? की केवळ देह सजविला जावा? तो वरून नव्हे तर मनाचा मेकअप जास्त महत्त्वाचा आहे. ती मानसिकता मनोभूमी महत्त्वाची. कारण त्या मनामध्ये पशुत्व नको, देवत्व हवे. भावना शून्यत्व नव्हे, ममत्व हवे, नाटकी स्वार्थ वृत्ती नको. नि:स्वार्थ, निखळ, निर्मळ नात्यासाठी सामंजस्य हवे. तसं पाहता जीवन म्हणजे संघर्ष, संग्राम, लढा, झुंज ती काही एकट्या-दुकट्याचे जगण्याची गोष्ट नाही. तिने व त्याने एकट्याने लढण्याची, जगण्याची गोष्टच नाही. एकमेकांसाठी एकमेकांच्या साथसोबतीने, सात वचनांनी सप्तपदीचे पालन करणारे ते एक गोड चौकट, ओलावा, गोड तुरुंग म्हणजे संसार आहे. म्हणून तर लग्नाची बेडी म्हणतात. पण ही बेडी कुठेतरी बेगडी होत चालली आहे.

संत कवयित्री बहिणाबाई म्हणतात, “अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर…” या संसाराला तू लोढन समजू नको. अरे तो गळ्यातला हार आहे आणि मुला-मुलींनो आता सावधान लग्नाच्या बोहल्यावर चढताना, विचार करूनच पाऊल टाका. आपल्यासाठी ज्या माता-पित्यांनी सामाजिक प्रतिमा व भान जपले त्यांना तडा जाऊ देऊ नका. रूपापेक्षा गुणांना जास्त महत्त्व द्या. व्यसनांधता असेल, तर पहिले व्यसन सोडा. मग प्रपंच जोडा! आपल्या खांद्यावर निर्धास्थपणे मान ठेवून येणाऱ्या जीवनसाथीचा केसाने गळा कापू नका. तिच्याशी एकनिष्ठ राहा. एकत्र या, पुन्हा कधीही दूर न जाण्यासाठी वाटेल ते करा. पण टिकवा आपली संस्कृती. एक जबाबदार, सुशिक्षित नागरिक म्हणून. केवळ एटीएम, बीएमडब्ल्यू, एप्पल, पॅकेज, ईझी मनी, करिअर, फ्रेंडशिप, चेंज यांच्या मागे न लागता तुम्ही तुमच्यासोबतच्या जीवनसाथीबरोबर आयुष्याची वाट लावून घेऊ नका, तर साथ निभावण्याची कृतार्थता ठेवा. तुम्ही जीवन सार्थकी लावा. जीवन जगताना कर्तृत्वाला सिद्ध करावे. त्याचा व नात्याचा समतोल तोल सांभाळणारी ती असावी. तसं समतोल राखून आपल्या व तिच्या जन्मदात्यांना घरच्यांना आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांनाही जबाबदारीने सुखी करावं. ही जबाबदारी केवळ आपली असते. जीवनाच्या प्रवाहात वाहत असताना संगतीलाही तितकंच महत्त्व द्या. तन्मयता, तल्लीनता आणि तत्परता, तारुण्याच्या तीन तकारांमध्ये युवा पिढीला आदर्श प्रेरणादायी विवेकानंद स्वामींची तरुणाईची व्याख्या. युवक-युवतींची ही जबाबदारी आता अत्यंत आपली संस्कृती संवर्धनासाठी जोपासण्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, काडी काडी जमवून बनवलेलं घरटं मोडकळीस आलं की, वादळात, भूकंपात, सुनामी जाण्यापूर्वी या भावना जपायलाच हव्यात. परवाच एका वधू-वर सूचक मंडळ मेळाव्यास मार्गदर्शन करताना हे मुद्दे प्रकर्षाने लक्षात आले. बर्हिरंगापेक्षा अंतरंग महत्त्वाचा. कारण सच्चेपणा, सत्य हा चेहरा सांगतो. त्यामागचा नकार, मुखवटा, दिखावा, फसवणूक न होता पारदर्शक मन, विचार आणि कृती करावी.

Recent Posts

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind…

2 mins ago

PM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करणं अशक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबारमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल…

14 mins ago

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनंतर निकाल!

दोघांना जन्मठेप आणि सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र…

2 hours ago

MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना मोजताही येईना!

मध्यप्रदेशमध्ये सापडला पैशांचा डोंगर मध्य प्रदेश : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना…

2 hours ago

China panda news : अशी ही बनवाबनवी! प्राणिसंग्रहालयात पांडा नव्हते म्हणून कुत्र्यांना दिला काळा-पांढरा रंग

कारवाई होणार असूनही प्रशासन निर्णयावर ठाम बेईजिंग : चीनच्या एका प्राणिसंग्रहालातून (China zoo) अजबगजब बाब…

3 hours ago

Shrimant Dagadusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

आकर्षक फुलं आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी…

3 hours ago