Bank Holidays : मे महिन्यात ‘या’ दिवशी असणार बँका बंद, एकूण ११ दिवसांचा समावेश

Share

मुंबई : आगामी १ मे २०२४ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेचे कॅलेंडर जारी केले आहे. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि इतर प्रसंगांशी संबंधित सुट्ट्या देखील बँकेच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पहा.

आगामी मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे पुढच्या महिन्यांतील सुट्ट्यांची संख्या जास्त आहे. आगामी महिन्यात कामगार दिन आहे, त्यानंतर रविंद्रनाथ टागोर, नझरुल यांची जयंती आहे. अक्षय्य तृतीयादेखील आहे. त्यामुळे संपूर्ण देशात बँका साधारणपणे ११ दिवस बंद असतील.

काही सुट्ट्या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित

मे महिन्यात बँका एकूण अकरा दिवस बंद असल्या तरी या दिवसांत ऑनालाईन बँकिंगची सुविधा चालू असणार आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची कामे करता येतील. काही सुट्ट्या या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत बदल होऊ शकतो.

‘या’ दिवशी असणार बँका बंद

१ मे – महाराष्ट्र दिन, कामगार दिन
५ मे – रविवार
८ मे – रविंद्रनाथ टागोर यांची जयंती (पश्चिम बंगाल)
१० मे – बसव जयंती (कर्नाटक)
११ मे – दुसरा शनिवार
१२ मे – रविवार
१६ मे -स्टेट डे (सिक्कीम)
१९ मे – रविवार
२३ मे – बुद्ध पौर्णिमा
२५ मे – नझरुल जयंती, चौथा शनिवार
२६ मे – रविवार

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

48 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

3 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

4 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

9 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago