Back Pain: पाठदुखीच्या समस्येमुळे त्रस्त आहात? करा ‘हे’ सोपे उपाय

Share

मुंबई : दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून- आवरून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. खरंतर अनेक तास सतत बसून काम केल्यामुळे अनेक लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. सतत बसून राहिल्याने किंवा चुकीच्या स्थितीत बसल्यानेसुद्धा ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे पाठीच्या कण्यावर खूप दबाव येतो. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर या काही सोप्या उपयांचा वापर करुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

अशी घ्या पाठदुखीवर काळजी-

  • योग्य व पौष्टिक आहार घ्या

आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीशी तसेच आपण काय खातो, कसा आहार घेतो, याच्याशी देखील संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही जर पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात हेल्दी पदार्थांचा, पौष्टिक अन्नाचा समावेश करा. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यामुळे आपली हाडे मजबूत होत असतात.

  • पाठीचा कणा ताठ ठेवा

चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच कार्यालयात काही वेळानंतर फेरी मारत पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे.

  • योग्य स्थितीत बसावे

सतत बसून राहिल्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो, पण चुकीच्या स्थितीत बसल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. खरंतर अनेक लोकांना पुढे वाकून काम करण्याची सवय असते. इतकंच नाही तर अनेकदा मोकळ्या वेळेत मोबाईल वापरतानाही आपण नीट बसत नाही, त्यामुळे पाठीच्या कण्यावर खूप दबाव येतो. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर योग्य स्थितीत बसून काम करावे.

  • गूळ आणि जिऱ्याचा काढा

एक कप पाण्यात गूळ आणि जिरा टाकून शिजवून तो काढा प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.

  • खोबरेल तेल

एक चमचा खोबरेल तेलात दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या टाकून तेल गरम करा आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करा.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago