Thursday, April 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत अतिशाची एंट्री

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत अतिशाची एंट्री

  • ऐकलंत का! : दीपक परब

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे कथानक आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले असून शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचविण्यासाठी ‘मंगल’ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास ३० वर्षे खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झाली आहे. सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्के-पाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे जयदीपची आई. ३० वर्षे मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचे ठरवले आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक ही ‘मंगल’ व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी अतिशा खूप उत्सुक असून बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत जोडले जाण्याचा तिला आनंद वाटत आहे. ‘मंगल’ पात्र साकारताना कस लागतोय. तुरुंगात ३० वर्षे राहून आलेल्या मंगलची दहशत आहे. तिचा स्वभाव फारच रुक्ष आहे. आपल्या मुलाच्या भेटीसाठी आसुसलेली आणि ज्यांच्यामुळे मुलगा दुरावला अशांना अद्दल घडवू पाहणारी अशी ही मंगल अतिशा साकारणार आहे. अशी व्यक्तिरेखा अतिशा प्रथमच साकारणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या परिवारात जरी ती नवी असली तरी सेटवर तिला असे कुणी जाणवू दिलेले नाही. सर्वच सहकलाकारांसोबत तिची छान मैत्री झालेली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. असेच प्रेम ‘मंगल’ या पात्रालाही मिळेल याची खात्री तिला वाटत आहे. या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेतील गौरी ही भूमिका गिरिजा प्रभू ही साकारत आहे, तर जयदीप ही भूमिका मंदार जाधव हा साकारतोय. मालिकेचे कथानक देखील प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

‘नाटू नाटू’चा डंका; ऑस्करनंतर कित्येक पटीने वाढले सर्चिंग

स्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीने इतिहास रचला. ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘ऑस्कर’मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमधील पुरस्कारावर नाव कोरले. त्यानंतर आता हाती आलेल्या अहवालानुसार,‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर गुगलवर या गाण्याचे सर्चिंग १,१०५ पटीने वाढले आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर जगभरातील सिनेप्रेमी ‘नाटू नाटू’ हे गाणं गुगलवर सर्च करत आहेत. मार्चमध्ये रिलीज झालेल्या या गाण्याला टिक-टॉकवर ५२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणे गायले. त्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. ऑस्कर सोहळ्यात या गाण्याला ‘स्टँडिंग ओव्हेशन’देखील मिळाले.

‘आरआरआर’ हा सिनेमा २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. देशासह परदेशातदेखील या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील ‘नाटू नाटू’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. हे गाणं चंद्रबोसने लिहिले आहे तर एमएस किरावणीने संगीतबद्ध केले आहे. ‘नाटू नाटू’ हे गाणे हिंदीत ‘नाचो नाचो’, तमिळमध्ये ‘नट्टू कूथु’ आणि कन्नडमध्ये ‘हल्ली नातू’ म्हणून रिलीज करण्यात
आले आहे.

पुरस्कार सोहळ्यात धूम

‘ऑस्कर’मध्ये एस. एस राजामौलींच्या आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने इतिहास घडवला आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. या गाण्यावर प्रेम रक्षित यांनी केलेल्या कमालीच्या नृत्यदिग्दर्शनालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -