Arun Govil: छोट्या पडद्यावर गाजवली रामाची भूमिका; पण राजकारणी झाल्यानंतर अभिनयाला रामराम!

Share

कोण आहे ‘हा’ अभिनेता?

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री आता राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच प्रभू राम म्हणून ओळखले जाणारे अरुण गोविल (Arun Govil) यांचाही समावेश आहे. छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल घराघरांत पोहोचले. श्री रामाची भूमिका साकारुन त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपाने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथ या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला रामराम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अरुण गोविल आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप उत्साही आहेत. नुकतेच त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. ‘अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे’ असे अरुण गोविल यांनी सांगितले. तसेच अरुण गोविल पुढे म्हणाले की,”याआधीदेखील मला राजकीय पक्षांकडून निवडणुकीला उभं राहण्याची विचारणा झाली आहे. पण त्यावेळी राजकारणात येण्याचा मी काहीही विचार केला नव्हता. राजकारणाचा प्रवास कसा होतोय यावर पुढची गणितं अवलंबून असतील. सध्या मी यावर उघडपणे काहीही बोलू इच्छित नाही. सध्यातरी माझं संपूर्ण लक्ष आगामी निवडणुकांवर आहे”असे अरुण गोविल यांनी सांगितले.

‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील अरुण गोविल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना हे फोटो पाहता आले नव्हते. अरुण गोविल सध्या त्यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.

Recent Posts

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

11 mins ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

46 mins ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

5 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

8 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

8 hours ago