राजस्थानात कैद्याची हत्या करणारा अटकेत

Share

नालासोपारा  :राजस्थानच्या जोधपूर येथे न्यायालयात हजर करण्यासाठी नेलेल्या कैद्यावर गोळीबार करून, खून करणाऱ्या मुख्य सूत्रधारास बोरिवली येथे ताब्यात घेण्यात आले. वसईच्या वालीव आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्तरित्या रविवार रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली.

शिवरतन ऊर्फ प्रिन्स भावरसिंग राजपूत असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुंडाचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. जोधपूर सिटी पूर्व राजस्थान रातानाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३५३, ३३२, ३०७, ३४, १२० (ब), सह आर्म ऍक्ट ३, २५, २७ अन्वये गु्न्हा दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कालपरी ऊर्फ प्रदीपपुरी शंकरपुरी गोस्वामी यास १८ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या पाली येथील न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर आरोपीला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना जोधपूरच्या भाटी चौराह येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. आरोपी आणि पोलिसांवर सहा गोळ्या झाडून ते फरार झाले होते. या फायरिंगमध्ये गोस्वामी या आरोपीचा जागीच मृत्यू झाला होता.

दोन टोळींच्या वादातून हा प्रकार घडल्याने राजस्थान पोलिसांनी तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. हे दोन्ही आरोपी राजस्थानवरून मुंबई, वसई-विरार परिसरात असल्याची खात्री पटल्यानंतर राजस्थान पोलीस रविवारी वसईत दाखल झाले होते. राजस्थान पोलिसांनी वसईच्या वालीव पोलिसांची मदत घेत आरोपी शिवरतन ला रविवारी रात्री बोरिवलीच्या एमसीएफ गार्डन येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Recent Posts

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

4 mins ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

11 mins ago

Cartoon characters : आपली मुलं कार्टून्सच्या माध्यमातून काय पाहताहेत?

आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने…

22 mins ago

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४ सहलीचे आयोजन कराल मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप…

27 mins ago

Travel : प्रवास…

हलकं-फुलकं : राजश्री वटे प्रवास... कुठून सुरू होतो... कुठे संपतो...! कसा सुरू होतो... कसा संपतो...!!…

35 mins ago

मोबाइलसाठी गर्दुल्ल्याने घेतला पोलिसाचा जीव

क्राइम : अॅड. रिया करंजकर देशामध्ये आज बिकट परिस्थिती चालू आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असून,…

40 mins ago