Categories: पालघर

अर्नाळा किनाऱ्याला उधाणाचा फटका

Share

विरार (प्रतिनिधी) : अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा उधाणाचा फटका बसला. जोरदार वारे आणि लाटांमुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील उद्यानात शिरल्याने या उद्यानातील अनेक झाडे उन्मळून व मोडून पडली आहेत. अचानक आलेल्या या उधाणामुळे पर्यटकांचीही तारांबळ उडाली होती.

पावसाळा सुरू झाल्यापासून अर्नाळा किनाऱ्याला सातत्याने उधाणाचा सामना करावा लागतो आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या उधाणानंतर शुक्रवारी या किनाऱ्याला पुन्हा एकदा मोठ्या उधाणाचा सामना करावा लागला आहे. जोरदार वारे आणि लाटांमुळे समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यावरील उद्यानात शिरले. वाऱ्यामुळे नारळ आणि सुरूची काही झाडे मोडून पडली आहेत. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे पर्यटकांचीही त्रेधातिरपिट उडाली.

१ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झालेला आहे. मात्र हवामान खात्याने समुद्रात वादळांची शक्यता वर्तवल्याने दोन दिवसांपूर्वीच मच्छीमार बांधव रिकामी हाती घरी परतले होते. वादळांची शक्यता आणखी काही दिवस असल्याने समुद्राला सातत्याने उधाण येत असल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

जुलै महिन्यात आलेल्या उधाणावेळी किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरादारांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आलेले हे दुसरे मोठे उधाण असल्याचे पसिरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा कोळी बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Recent Posts

खोटेपणाचा पेहराव

उबाठा सेनेचे प्रमुख सध्या अस्वस्थ झाले असून प्रचारसभांमधून विकासकामे, देशापुढील समस्या, आव्हाने यावर न बोलता…

5 mins ago

नाक खुपसणे थांबणार कधी?

विश्वसंचार: प्रा. डॉ. विजयकुमार पोटे समस्त जगावर वर्चस्व गाजवण्याच्या अभिनिवेशात असणारा अमेरिकेसारखा देश विविध देशांमध्ये…

36 mins ago

कोकणात परप्रांतीय स्थिरावतात, पण…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकण प्रांत वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे पिकणाऱ्या फळांचं कौतुक जगाला आहे.…

1 hour ago

PBKS vs RR: सॅम करनच्या खेळीने पंजाबला तारलं, ५ गडी राखुन राजस्थानला मारलं…

PBKS vs RR: राजस्थान आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात संजु सॅमसनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.…

3 hours ago

Indian Railway : रेल्वेची फेरीवाल्यांवर करडी नजर; खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्यांना मज्जाव

फेरीवाल्यांवर कारवाई करत तब्बल 'इतका' दंड केला वसूल पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये अनधिकृत…

3 hours ago

UGC : धक्कादायक! यूजीसीच्या अँटी-रॅगिंग हेल्पलाइनवर लैंगिक, शारिरीक शोषणाच्या गंभीर तक्रारी

दररोज सरासरी ३०० कॉल्स सामान्य, ३-४ रॅगिंगच्या तक्रारी पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाची अँटी-रॅगिंग हेल्पलाइन…

4 hours ago