अ‍ॅपलचे सीइओ टीम कूक यांनाही आयपीएलची भूरळ, सोनम कपूरसोबत लावली हजेरी

Share

नवी दिल्ली: सध्या सगळीकडे आयपीएलचा धमाका सुरु आहे. अ‍ॅपलचे सिईओ टीम कूक यांनाही आयपीएलची भूरळ पडली आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना बघण्यासाठी ते थेट सोनम कपूरसोबत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमला हजेरी लावली होती. टीम कूक यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद अहुजाही त्यांच्यासोबत आयपीएलची मॅच पाहण्यासाठी आला होता.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीम कूक यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या या सामन्याचा कूक यांनी चांगलाच आनंद घेतल्याचे दिसत आहे.

अ‍ॅपलचे सिईओ टीम कूक इथे राहण्याचा तुम्ही आनंद घेतला असेल, अशी आशा आहे. भारतातील अ‍ॅपलच्या स्टोरमधून तुम्ही दिलेला हा वर्ल्ड क्लास अनुभव आम्हाला घेता यावा यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार, असं सोनमने फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, गुरुवारी खेळवण्यात आलेल्या कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करत असतानाच दिल्ली संघाने ४ विकेट्सने हा सामना जिंकला आहे.

Recent Posts

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

6 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

7 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

8 hours ago

कामगारांना सुरक्षित वातावरण हवे

आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…

8 hours ago

‘मॉरिशस रूट’ टाळण्यासाठी…

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…

9 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर,…

9 hours ago