Shah Rukh Khan Birthday : बर्थडे मेरा पर तौफा आप सभी के लिए… किंग खानचं चाहत्यांसाठी आणखी एक गिफ्ट!

Share

डंकीच्या टीझरनंतर आता ‘ही’ खुशखबर

मुंबई : बॉलिवूडचा बादशहा (Bollywood Badshah) शाहरुख खान आज आपला ५८वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. त्याच्या अभिनयाने त्याने जगभरातून प्रचंड मोठा चाहतावर्ग (Fan following) गोळा केला आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ (Mannat) या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. आजच्या रात्रीही शाहरुखने घराच्या गेटवरुन सगळ्यांना हात दाखवत अभिवादन केलं. त्यामुळे तिथे उपस्थित चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

यानंतर आता प्रत्यक्ष वाढदिवशी किंग खान आपल्या चाहत्यांसाठी दोन मोठे गिफ्टस घेऊन आला आहे. एक भेट म्हणजे शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. तर दुसरी भेट म्हणजे, जगभरात गाजलेला शाहरुखचा ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट आजपासून नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

‘जवान’ ओटीटीवर रिलीज होण्याआधी शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने बॉम्ब लावलेला असतो आणि तो जवान नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यासाठी धमकी देत असतो. शाहरुख म्हणतो,”हॅलो नेटफ्लिकसवा, पहचानो मैं कहाँ हूँ? अगले दो मिनिट में जवान नेटफ्लिक्स पे रिलीज कर दो नहीं तो मैं तुम्हारे टुडुम का कर दूँगा बुडूम!”. त्यानंतर लगेचच ‘जवान’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येतो. बॉम्ब फुटतो त्यावेळेस शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकतो आणि बादशहा आपल्या चाहत्यांना म्हणतो, ‘बर्थडे मेरा पर तौफा आप सभी के लिए, जवान देखिए’.

‘जवान’ या सिनेमाची निर्मिती ३०० कोटींमध्ये करण्यात आली होती, पण या सिनेमाचे राइट्स नेटफ्लिक्सने २५० कोटींमध्ये विकत घेतले आहेत. ‘जवान’ या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट ‘जवान’ ठरला आहे, ११०० कोटींपेक्षा अधिक कमाई त्याने केली आहे. त्यामुळे रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने इतिहासही रचला आहे. या चित्रपटाच्या ओटीटीवरील आगमनाने चाहते खूश झाले आहेत. शिवाय ‘डंकी’ या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Recent Posts

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

2 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

3 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

3 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

4 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

6 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

7 hours ago