Amit Shah to Ajit Pawar : अमित शहांनी अजितदादांना सांगितली ‘ही’ खास गोष्ट

Share

भाषणाच्या सुरुवातीलाच केला अजित पवारांचा उल्लेख…

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे (Sahkar se Samruddhi Portal) उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी एक खास गोष्ट सांगितली.

अमित शाह म्हणाले, ‘सगळ्यात आधी अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊन कार्यक्रम करत आहे. त्यामुळे मी दादांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, बर्‍याच कालावधीनंतर तुम्ही योग्य जागेवर बसला आहात. हीच जागा योग्य होती मात्र तुम्ही खूप वेळ लावला’, असं सूचक वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.

पुण्यातील या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगेल यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

23 mins ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

2 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

3 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

3 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

4 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

4 hours ago