अजित पवारांनी ट्विट करत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे केले अभिनंदन

Share

 

अजित पवारांना देश पातळीवर एकही जबाबदारी नाही

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या नेमणुकीवर अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ अशी भूमिका घेतली होती. सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या नेमणुकीवर अजित पवारांनी माध्यमांसमोर बोलणे टाळले. मात्र आता ट्विट करत त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये अजित पवार यांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र विधानसभा विरोधी पक्षनेत्याचे मोठे पद राज्य पातळीवर त्यांच्याकडे आहे. अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये ‘पवार साहेबांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देईल’ असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी आधी ‘नो कमेंट्स’ असे म्हणत नंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या त्यामुळे अजित पवार आधी नाराज होते का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीत काही आलबेल नाही अन् अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही स्पर्धा आहेच हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

1 hour ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

2 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

3 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

3 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

3 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

3 hours ago