AI-Driving Tests : आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार एआय परीक्षा!

Share

मुंबईसह राज्यातील १७ शहरांमध्ये आता एआय आधारित ड्रायव्हिंग चाचण्या

मुंबई : यापुढे वाहन परवाना काढायचा असेल तर तुम्हाला ड्रायव्हींग स्किल म्हणजेच वाहन चालविण्याचे कौशल्य (AI-Driving Tests) वाढवावे लागेल. जर तुम्ही ते वाढवले नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित म्हणजेच Artificial Intelligence (AI)-based tests चाचणी तुम्हाला उत्तीर्ण करता येणे अवघड जाईल.

राज्यातील रस्त्यांवर वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच महाराष्ट्र मोटार वाहन परिवहन विभागाने राज्यातील रस्ते अपघातांचे उच्च प्रमाण आणि वाहतूक शिस्तबद्धतेचे निराकरण करण्यासाठी ड्रायव्हिंग परीक्षांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चाचण्या सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. या चाचण्या मुंबईसह १७ ठिकाणी घेतल्या जातील. ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी एआय सॉफ्टवेअरसह एकत्रित स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक तयार केले जातील.

सन २०२२ पासून महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. हे प्रमाण ०.४४ टक्के असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात हे राज्यातील नागरिकांच्या मृत्यू आणि जखमी होण्याचे मोठे कारण ठरते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने एका आकडेवारीत म्हटले आहे की, जगभरात अपघाती मृत्यूचे प्रमाण १६.३८ टक्क्यांनी वाढले आहे. भारतात तर देशातील एकूण मृत्यूंपैकी पाचवा मृत्यू हा अपघातातील असतो. जखमींबाबतही तसेच आहे. या अपघातांमुळे देशाच्या जीडीपीच्या वार्षिक अंदाजे ३ टक्के नुकसान होते.

रस्त्याच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ड्रायव्हर्सच्या संवेदनाक्षम आणि मोटर कौशल्यांचे मूल्यमापन करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, रस्ते अपघातांमध्ये वाहन चालविण्याचे कौशल्य हे प्रमुख योगदान देणारे घटक म्हणून संशोधनाने ओळखले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाच्या योजनेमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हे ट्रॅक सुरक्षित ड्रायव्हिंग कौशल्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यमापन करतील. एआय पॅरामीटर्सच्या आधारे उमेदवारांचे मूल्यांकन करून भ्रष्टाचार दूर करतील.

याव्यतिरिक्त, केंद्रीय मोटार वाहन नियम १५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या २४ चाचणी मूल्यमापन बिंदूंपैकी सात स्वयंचलित असतील.

चाचणी ट्रॅक वाहनांच्या तीन वर्गांची पूर्तता करतील : दुचाकी, हलकी मोटार वाहने आणि मध्यम/जड व्यावसायिक वाहने.

चाचण्यांमधील एआय एकत्रीकरणामध्ये चेहऱ्याची ओळख आणि अर्जदाराची ओळख यांसारख्या बाबींचा समावेश असेल.

रीअल-टाइम ड्रायव्हिंग चाचणीसाठी वेगवेगे ट्रॅक उत्पन्न केले जातील. ज्यामध्ये दैनंदिन जीवनात वाहन चालवताना निर्माण होणारे अडथळे उपलब्ध केले जातील. जसे की, अचानक पादचारी/वस्तू दिसणे. आणीबाणीची स्थिती निर्माण होणे, अशा वेळी चालक काय निर्णय घेतो. वाहन कसे हाकतो याबाबत निरिक्षण केले जाईल. तसेच ट्रॅकमध्ये आठ ट्रॅक, एच-ट्रॅक, ट्रॅफिक सिग्नल चाचण्या, झेब्रा क्रॉसिंग चाचण्या, झिग-झॅग टर्न, ग्रेडियंट चाचण्या आणि दुचाकींसाठी सर्पेन्टाइन ट्रॅक यासह विविध घटकांचा समावेश असेल.

प्राप्त माहितीनुसार एकूण १७ शहरांमध्ये या चाचणीचा प्रयोग केला जाईल. त्यापैकी मुंबई सेंट्रलमध्ये दुचाकी वाहनांसाठी दोन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एक चाचणी ट्रॅक असेल. ज्यामध्ये इतर ठिकाणी बडनेरा (अमरावती), बुलढाणा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, नागपूर पूर्व, नांदेड, अहमदनगर, आळंदी-पुणे, औरंगाबाद, हडपसर-पुणे, जळगाव, सासवड-पुणे, कोल्हापूर, नांदिवली ठाणे, पनवेल आणि पेण यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाची उद्दिष्टे

  • अर्जदारांच्या सुरक्षित ड्रायव्हिंग कौशल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यमापन करणे
  • कमीतकमी मानवी हस्तक्षेपासह एक कार्यक्षम आणि पारदर्शक प्रणाली स्थापित करणे
    ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी प्रतीक्षा कालावधी कमी करणे
  • योग्य ड्रायव्हिंग प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे
  • वाहतूक आणि वाहन चालविण्याच्या नियमांबद्दल जागरूकता वाढवणे
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Savings: बचत खात्यावर कसे मिळणार FDचे रिटर्न?

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमावलेल्या पैशातून काही ना काही रक्कम वाचवत असतो. थोड्या थोड्या पैशातूनच बचतीची…

53 seconds ago

IPL 2024: कोहलीच्या जोरावर RCB प्लेऑफसच्या शर्यतीत, जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी…

1 hour ago

Loksabha Election 2024: पंतप्रधान मोदींचा आज जोरदार प्रचार, तेलंगणाा आणि ओडिशामध्ये सभा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४च्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. देशभरात सोमवारी म्हणजेच…

2 hours ago

Akshaya Tritiya 2024: आज आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त

मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण…

3 hours ago

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

10 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

11 hours ago