Threat call to Honey Singh : सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी

Share

दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

नवी दिल्ली : गायक-गीतकार सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose wala) याच्या हत्येची बातमी गेल्यावर्षी समोर आली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याने आता गायक यो यो हनी सिंगला (Yo Yo Honey Singh) जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघडकीस आले आहे. हनी सिंग याने कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बराड असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणीचे कॉल आल्याचे सांगितले होते. या प्रकरणी त्याने स्वतः दिल्ली पोलीस (Delhi Police) आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याने बुधवारी २१ जूनला यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंगला सध्या कॅनडामध्ये लपलेल्या गँगस्टरकडून व्हॉईस मेसेज (Voice Message) मिळाला. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. ‘आजवर मला माझ्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले, मात्र अशी धमकी पहिल्यांदाच आल्याने मी व माझे कुटुंबीय प्रचंड घाबरलो आहोत’, असे हनी सिंगने आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर काही दिवसांआधी सलमान खानला (Salman Khan) गोल्डीने धमकी दिली होती. सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र लिहित सलमानचे सिद्धू मूसेवालासारखे हाल करणार असल्याचं त्यामध्ये म्हटलं होतं. यानंतर आता हनी सिंगला व्हॉईस मेसेजद्वारे धमकी देण्यात आली आहे. गोल्डीचं खरं नाव सतविंदरजीत सिंह आहे. गोल्डी लॉरेंस बिश्नोईचा खास असून कॅनडामधून काम पाहतो.

हनी सिंग हा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असून त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मध्यंतरी त्याने मोठा ब्रेक घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत हनी सिंगने गायलेली काही गाणी रिलीज होऊन ती हिटही झाली. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi ka bhai Kisi ki jaan) या चित्रपटासाठीदेखील हनीने गाणी गायली. अशातच आता हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

24 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

1 hour ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

2 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

2 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

2 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

3 hours ago