Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमुंब्र्यात इमारतीचा काही भाग बाजूच्या चाळीवर कोसळला

मुंब्र्यात इमारतीचा काही भाग बाजूच्या चाळीवर कोसळला

ठाणे/ मुंब्रा : डायघर गावातील नाक्याजवळ असलेल्या जयंता अपार्टमेंट या तळ अधिक पाच मजली इमारतीच्या एका बाजूचा काही भाग शुक्रवारी रात्री उशिरा बाजूच्या चाळीतील घरावर कोसळला. यामुळे उर्वरीत इमारत एका बाजूला झुकलेली आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली. इमारतीच्या प्रत्येक मजल्यार प्रत्येकी सहा रूम होते. त्यापैकी पहिल्या मजल्यावरती तीन व दुसऱ्या मजल्यावरती पाच अशी एकूण आठ कुटुंबे राहत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. व उर्वरित इमारत यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. तसेच इमारतीच्या सभोवताली असलेली चाळीमधील घरे रिकामी करण्यात येऊन तेथील रहिवाशांना पडले गावातील ठा.म.पा. शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यांनी शाळेत स्थलांतर होण्यास नकार देऊन जवळच राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था स्वतःहून केलेली आहे.

घटनास्थळी डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, टोरंट विद्युत कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, १- बाईक ॲम्बुलन्स, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, अग्निशमन केंद्राचे जवान १- फायर वाहनासह उपस्थित होते.

सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारत सद्यस्थितीला रिकामी करण्यात आलेली असून इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे व सभोवताली धोकापट्टी लावण्यात आली आहे.

दरम्यान, इमारतीच्या जागेचे मालक बाबुराव चांगा पाटील यांनी इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांची माहिती दिली.

पहिला मजला

रूम नंबर १०१, मालक – श्री. बाबुराव चांगा पाटील.
रूम नंबर १०२, मालक – श्री. बाबुराव चांगा पाटील.
रूम नंबर १०३, मालक – श्रीमती. वृषाली कृष्णा भोईर.

दुसरा मजला

रूम नंबर २०१, मालक – श्री. नामदेव पाटील.
रूम नंबर २०२, मालक – श्रीमती. माया पाटील.
रूम नंबर २०३, मालक – श्री. बाबुराव पाटील.
रूम नंबर २०४, मालक – श्रीमती. सुनिता पाटील.
रूम नंबर २०६, मालक – श्रीमती. बायमाबाई पाटील.

अपुऱ्या प्रकाशामुळे रात्री सदर इमारती वरील कार्यवाही थांबवण्यात आली होती. सकाळी इमारतीवर पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -