Tuesday, June 18, 2024
Homeदेशदिल्लीच्या अलीपूरमध्ये फॅक्टरीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

दिल्लीच्या अलीपूरमध्ये फॅक्टरीत भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: राजस्थानी दिल्लीमध्ये आणखी एका आगीची भीषण घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमध्ये पेंट फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ जखमीही झाले होते. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अधिकतर मृतांची ओळख पटवणे मुश्किल आहे. त्यांचे शरीर पूर्णपणे जळाले आहेत. मृत व्यक्ती कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळेस ही आग लागली तेव्हा ते आग विझवण्याचे काम करत होते. याचदरम्यान पेंट बनवणाऱ्या केमिकल ड्रमचा स्फोट झाला.

फॅक्टरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील अलीपूर हा भाग गर्दीचा भाग आहे. त्यातच ही पेंट फॅक्टरी चालवली जात होती. गुरुवारी संध्याकाळी येथे आगीचा भडका उडाला. केमिकलमुळे ही आग आणखी पसरत गेली. यामुळे फॅक्टरीमधील लोकांचा जळून मृत्यू झाला. सुरूवातीला ही संख्या ३ होती मात्र रात्री उशिरापर्यंत हा आकडा ७वर गेला. यामुळे परिसरात हाहाकाराची स्थिती झाली आहे.

अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी विझवली आग

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -