मातीविना शेती करणारी कृषिकन्या

Share

अर्चना सोंडे

ग्रामीण भागातील शेतांपेक्षा शहरी भागात पिके चांगली वाढतात. उत्पादन चारपट वाढते. ब्रिटनच्या लँकेस्टर विद्यापीठाच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. भारतातील एक शिक्षिका हे संशोधन प्रकाशित होण्याअगोदर काही वर्षांपासून मातीविना शेती या संकल्पनेवर शहरामध्ये काम करत आहे. विशेष बाब म्हणजे निव्वळ भारतातच नव्हे, तर जगभरातील ६ देशांमधील नागरिकांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. कृषिप्रधान देशातील ही आधुनिक कृषिकन्या म्हणजे एन्टरुफ हायड्रोफोनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका अरुणा मोरे.

अरुणा यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सागोला तालुक्यातील लोणविरे गावात झाला. बाबा तुळशीराम उबाळे लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर ते मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरीस लागले. बीएआरसी कॉलनीतच अरुणा यांचे बालपण गेले. शाळा नूतन विद्यालयामध्येच केले. शिक्षण झाल्यानंतर डीएड सौमय्या कॉलेजमधून केले. नंतर विद्यालयामध्येच शिक्षिका म्हणून ३१ वर्षे नोकरी केली. हे सगळं करत असताना बिझनेसचा किडा डोक्यात होताच, पण काय करायचे कसे करायचे हे ठरत नव्हते. याच दरम्यान अरुणा वेगवेगळ्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर जाऊ लागल्या, ज्ञान आत्मसात करू लागल्या.

बालपणापासूनच अरुणाला बागकामाची फार आवड होती. ही आवड बाबांमुळे तिला लागलेली. बीएआरसी कॉलनीत मोठं उद्यान होतं. तिकडे अरुणाचे बाबा सतत काही ना काही बागकाम करत. ते घरच्या घरी भाजीपाला पिकवत होते. निसर्गाच्या सानिध्यात खूप वेळ घालवल्यामुळे निसर्गाची, बागकामाची आवड निर्माण झाली होती. नेरुळला घरच्या बागेत त्या रमायच्या. नेरुळमध्ये त्यांच्या बागेला उत्कृष्ट बागेचे पहिले बक्षीस मिळत होते. २०१७ मध्ये अरुणाच्या भावाला कर्करोग झाला. त्याचा अरुणा मोरे यांच्यावर खोलवर परिणाम झाला.

‘आपण आपल्या आजूबाजूला जे दूषित अन्नपदार्थ पिकते तेच खात असतो आणि त्याचा परिणाम कालांतराने आपल्या शरीरावर होतो. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाजूला उगविणाऱ्या भाज्या आपण खातो. त्या कशा येतात आपल्याल काही माहीत नसते. विविध रसायनांचा वापर केल्याने आपलं शरीर पोखरत जातं, हे आपल्याला कळत नाही. परिणामी कर्करोगासारख्या आजाराला आपण बळी पडतो. हे मला बदलायचे होते त्यामुळेच ‘मातीविना शेती’ ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रुजविण्याचे मी निश्चित केले,’ अरुणा मोरे आपल्या मिशनविषयी सांगतात.

आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर आपण योग्य आहार घेतला पाहिजे आणि इतरांनाही त्या संदर्भात सांगितले पाहिजे. या हेतूने मी घरच्या घरी मातीविना शेती कशी करता येईल याच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. योग्य न्यूट्रिशियनयुक्त भाज्या, पाण्यावर उगवतोय. त्यामुळे पूर्णपणे दर्जेदार करतोय. शिवाय १०% पाण्याचा वापर आपण या शेतीसाठी करतोय. त्यामुळे ९०% पाण्याची बचत होते आणि महत्त्वाचं म्हणजे या भाज्या पिकविताना आपण व्यावसायिक विचारदेखील करू शकतो. सरकारचे रेडिसिक सर्टिफिकेट असल्यामुळे आपण या भाज्या निर्यातदेखील करू शकतो.

मातीविना शेती या कार्यशाळेमुळे खूप लोकांना मदत करत होते. २०१७ मध्ये एन्टरुफ हायड्रोफोनिक प्रायव्हेट लिमिटेड संस्थेची स्थापना केली. एन्टरुफ जर्मन शब्द आहे याचा अर्थ डिझाइन होतो, आहार, विहार, आचार-विचार हे महत्त्वाचे तीन बदल आयुष्यात झाले, तर आयुष्य आनंदी होईल, असे अरुणा मोरे म्हणतात. आम्ही आमच्या इथे याचा अनुभव देतो.

अरुणा मोरे यांची ज्येष्ठ कन्या मोनिका जगताप या इंजिनीअर आहेत. आठ-नऊ वर्षे विद्यालंकार महाविद्यालयात व्याख्याता म्हणून केल्यानंतर त्या आता एन्टरुफमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. व्यवस्थापन, निरनिराळ्या उद्योजकीय मंचावर व्यावसायिक सादरीकरण आदी बाबी त्या पाहतात. कनिष्ठ कन्या रुजुता या आर्किटेक्ट आहेत. त्या स्वतःच्या कामासोबत एन्टरुफमध्ये मार्केटिंग आणि इतर गोष्टी सांभाळतात.

आतापर्यंत एन्टरुफने १ लाख ५ हजार लोकांना मातीविना शेती या संकल्पनेने प्रभावित केले आहे. जगभरातील ८५०० हून अधिक लोकांना घरामध्ये भाजीपाला तयार करण्यासाठी मदत केली आहे. सन २०२५ पर्यंत एक लाखापेक्षा जास्त व्यावसायिक प्रकल्प करण्याचे एन्टरुफचे उद्दिष्ट आहे. एन्टरुफची कार्यशाळा १५ दिवसांची असते. दिवसातून १५-२० मिनिटे दिल्यास कोणीही व्यक्ती हायड्रोफोनिक शेतीचे तंत्र शिकू शकते. अरुणा मोरे, मोनिका जगताप आणि ऋजुता मोरे या तिघी कार्यशाळेस मार्गदर्शन करतात. अगदी मूलभूत विषयापासून अभ्यासक्रमाची सुरुवात होते. हायड्रोफोनिक शेती म्हणजे काय? कोणत्या भाज्या खाव्यात किंवा कशा घरच्या घरी पिकवाव्यात, व्यावसायिक प्रकल्प कसे उभरावेत या सगळ्याचे ज्ञान मेंटॉरशिप प्रोग्रॅममध्ये दिले जाते. सहभागी प्रशिक्षणार्थींकडून प्रकल्प अभ्यास करवून घेतला जातो. लोकांचा कार्यशाळेस खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

‘नासासारखी विश्वविख्यात वैज्ञानिक संस्था हायड्रोफोनिक शेती या विषयावर संशोधन करत आहे. हे खरंतर विज्ञान आहे, जे सर्वांना माहीत असले पाहिजे. आपण स्मार्ट सिटी विकसित करतोय, तसं स्मार्ट खाद्यसुद्धा तयार केले पाहिजे. शहरात राहूनसुद्धा ५०० स्क्वेअर फूट जागेमध्ये ५ एकरचं उत्पन्न घेता येऊ शकतं. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भारतातील काश्मीर, सिंगापूर, अमेरिका, जपान, दुबई, लडाख, कतार आदी जगभरातील लोक डिजिटली जोडले गेले आहेत. नुकतचं आम्ही हायड्रोनिटीफार्ममधील भाज्यांचं सॅलड बॉक्स बनवलेलं आहे, त्याला चांगलीच मागणी आहे.’ हे तंत्रज्ञान शिकून आधुनिक पद्धतीने शहरात व्हर्टिकल फार्मिंग करणे ही काळाची गरज आहे, असे अरुणा मोरे सांगतात.

Recent Posts

Marathi Vs Gujrati : गिरगावनंतर घाटकोपरमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रवेशबंदी

निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या राजकीय…

1 hour ago

Sugar Price Hike : तूरडाळ व तांदळाच्या दरवाढीनंतर आता साखरही कडवटणार!

प्रतिकिलो 'इतक्या' रुपयांची दरवाढ नागपूर : निवडणुकांची रणधुमाळी तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमची मोठ्या…

2 hours ago

ICSE Board चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

जाणून घ्या मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? नवी दिल्ली : काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट…

2 hours ago

Google Chrome : सावधान! गुगल क्रोम युजर्सना सरकारचा अलर्ट; होऊ शकते मोठे नुकसान!

लवकरच करा 'हे' अपडेट मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाचे आयुष्य इंटरनेटवर आधारित आहे. कधीही कोणतीही…

2 hours ago

Illegal money : पैशांचा पाऊस सुरुच! काँग्रेस मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली रोकड

रक्कम इतकी मोठी की नोटा मोजणाच्या मशीन्स मागवल्या मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…

3 hours ago

१००१ दिवसांच्या गुंतवणुकीवर ९टक्के व्याज, ही बँक देत आहे FDवर बेस्ट ऑफर

मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…

5 hours ago