Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीHijab Ban : मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम! विद्यार्थिनींची थेट न्यायालयात धाव

Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम! विद्यार्थिनींची थेट न्यायालयात धाव

जाणून घ्या नेमके प्रकरण काय

मुंबई : चेंबूर येथील महाविद्यालयाने प्लेसमेंटची वाढ आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हिजाब आणि बुरखाबंदी (Hijab Ban) करण्यात आली आहे. विद्यार्थी बुरख्यात नोकरी शोधायला गेले तर त्यांचा विचार केला जाईल का? समाजात कसे राहायचे आणि कसे वागायचे याबाबतचे मूल्य आणि शिष्टाचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, यासाठी हिजाब बंदीचा निर्णय घेतला असल्याचे आचार्य कॉलजने स्पष्ट केले होते. मात्र याप्रकरणाबाबत विद्यार्थिनींनी थेट मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या निर्णयाविरोधात नऊ विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात (NG Acharya and DK Marathe College) हिजाब, नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आली होती. या निर्णयाला घेऊन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कॉलेजच्या चौकटीत झालेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठांसमोर वकील अल्ताफ खान यांनी याचिका सादर केली. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आजपासून २०२४-२५ शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या निर्बंधामुळे आपल्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल, याची भीती विद्यार्थिनींना वाटत आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -