Ravindra Waikar : ठाकरे गटाला मोठा धक्का! रवींद्र वायकरांची शिवसेनेला साथ

Share

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर होणार जाहीर पक्षप्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तयारीत सर्व राजकीय पक्ष (Political parties) गुंतलेले असतानाच महाविकास आघाडीला (MVA) मात्र ऐन निवडणुकांच्या वेळी पक्ष सोडून चाललेल्या आपल्या नेत्यांची चिंता करावी लागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक नेते महायुतीमध्ये सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का पचवावा लागणार आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार, अत्यंत निष्ठावान नेते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर (Ravindra Waikar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची कास धरणार आहेत. हा मोठा मासा शिंदेंच्या गळाला लागल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत होणार आहे.

आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत (Shivsena) जाहीर प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहुर्त सापडला असून लवकरच ते एकनाथ शिंदेंची साथ देताना दिसणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. हा आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर?

जोगेश्वरी भागातून १९९२ मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले. २००६-२०१० या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर २०१९च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.

Recent Posts

चौथ्या टप्प्यातील निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा…

1 min ago

प्रचारसभांमध्येही नरेंद्र मोदीच आघाडीवर

राहूल-प्रियाकांच्या सभांची एकत्रित आकडेवारीही कमीच नवी दिल्ली : देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा आता…

37 mins ago

JP Nadda : भविष्यातही मोदी हेच नेतृत्व करणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डांचे केजरीवालांना प्रत्युत्तर नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही…

1 hour ago

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५४ हजार बॅलेट युनिट

२३ हजार कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान…

3 hours ago

Nitesh Rane : हिंदू राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या

आमदार नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन नालासोपारा : पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी एक…

3 hours ago

गोडसेंच्या प्रचारात भुजबळ सहभागी

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे मंत्री छगन भुजबळ आणि भुजबळ…

4 hours ago