मुल्लानपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या आजच्या सामन्यात प्रियांश आर्यने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला आहे. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २१९ धावा केल्या होत्या. २२० धावांचे आव्हान घेतलेल्या चेन्नईला या सामन्यात केवळ २०१ धावाच करता आल्या.
धोनी या सामन्यात पाचव्या स्थानावर खेळण्यासाठी आला. मात्र तो येईपर्यंत जिंकण्यासाठीचा रनरेट वाढला होता. त्यामुळे चेन्नईला हे आव्हान गाठता आले नाही. चेन्नईकडून डेवॉन कॉन्वेने सर्वाधिक ६९ धावा केल्या. शिवम दुबेने ४२ धावांची खेळी केली. तर धोनीने २७ धावा केल्या. मात्र त्यांच्या खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
तत्पूर्वी, प्रियांश आर्यने ठोकलेल्या १०३ धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने २१९ धावा केल्या होत्या.प्रियांशचे वय लहान असले तरी त्याची खेळण्याची शैली जबरदस्त होती. यात शशांत सिंहने ५२ धावा तडकावल्या होत्या. तर मार्को जेन्सने ३४ धावा केल्या होत्या.
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली राहिली नाही. दुसऱ्याच षटकांत प्रभासिमरन सिंहला मुकेश चौधरीने बाद केले. प्रभासिमनरला खातेही खोलता आले नाही. यानंतर अय्यर तिसऱ्या षटकांत बाद झाला. त्याने केवळ ९ धावा ठोकल्या. मार्कस स्टॉयनिसनेही कमाल करू शकला नाही. यानंतर एकाच षटकांत अश्विनने नेहाल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद केले.