Friday, April 25, 2025
Homeक्रीडाNaseem Shah: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली

Naseem Shah: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली

बाबर – रिझवानची जोडीही अपयशी

हॅमिल्टन : न्यूझीलंडच्या हॅमिल्टन येथील सेंडॉन पार्कमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान अपयशी ठरले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल १८ धावा, हेन्री निकोल्स २२ धावा , निक केली ३१ धावा केल्या आणि माइल्स हेने नाबाद ९९ धावा केल्या, तर मोहम्मद अब्बासने ४१ धावांचे जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तान समोर २९३ धावांचा डोंगर उभा केला. तसेच पाकिस्तानकडून सुफियान मुकीम आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.हारिस रौफ, अकिफ जावेद, फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आणि १ धावचीतच्या स्वरूपात पाकिस्तानने न्यूझीलंडला ५० षटकांत ८ बाद २९२ धावांवर रोखले.

IPL 2025:  पंजाबचा लखनऊवर जबरदस्त विजय

२९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. अब्दुल्ला शफीक ६ धावांवर, बाबर आझम ७ धावांवर आणि इमाम उल हक ९ धावांवर बाद झाले. मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांची भागीदारीही लवकरच तुटली, ज्यामुळे पाकिस्तानची स्थिती ३२ धावांत ५ बाद अशी झाली. तळातील फलंदाज फहीम अशरफ (७३) आणि नसीम शाह (५१) यांनी अर्धशतके झळकावली, परंतु संघ २०८ धावांवर ऑलआउट झाला आणि ८४ धावांनी पराभूत झाला. या विजयासह, न्यूझीलंडने मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. आता माऊंट मॉन्गनुई येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय मलिकेत पाकिस्तान संघाचा व्हाईटवॉश होतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -