संरक्षण मंत्रालयाचे एचएएलशी कोट्यवधींचे २ करार
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे २ करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे.
यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला ६६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला ९० हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे. या हेलिकॉप्टरचा पुरवठा कराराच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील ५ वर्षांत पूर्ण होईल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर ५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर कार्य करण्यास सक्षम आहे.
या हेलिकॉप्टरचे बहुतेक घटक भारतात डिझाइन आणि उत्पादित केले गेले आहेत आणि या खरेदी प्रक्रियेद्वारे हेलिकॉप्टर एकूण ६५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक प्राप्त करण्याचे नियोजन आहे. यामध्ये २५० हून अधिक देशांतर्गत कंपन्या सहभागी होतील, ज्यापैकी बहुतेक एमएसएमई असतील आणि ८५०० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करतील. दरम्यान, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्टच्या (एफआरए) वेट लीजसाठी मेट्रिया मॅनेजमेंटसोबत करार केला.
Amravati News : आठवडाभरात पारा ४० अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका
मेट्रिया ६ महिन्यांत एफआरए (केसी १३५ विमान) देईल, जे भारतीय हवाई दलाने भाडेतत्त्वावर घेतलेले पहिले एफआरए असेल. या तीन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे, २०२४-२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या १९३ वर पोहोचली आहे, ज्यांचे एकूण करार मूल्य २,०९.०५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आणि मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी ९२ टक्के कंत्राटे देशांतर्गत उद्योगांना देण्यात आली होती, ज्यांचे कंत्राट मूल्य १,६८.९२२ कोटी रुपये होते.
संरक्षण मंत्रालयाने नाग मिसाइल सिस्टमच्या (एनएएमआयएस) ट्रॅक्ड आवृत्तीच्या खरेदीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडसोबत करार केला. अँटी-टँक वेपन प्लॅटफॉर्म आणि फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसोबत सशस्त्र दलांसाठी सुमारे ५ हजार हलक्या वाहनांसाठी आणखी एक करार केला, ज्याची एकूण किंमत सुमारे २५०० कोटी रुपये आहे.