मुंबई : आयपीएल २०२५ स्पर्धेला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यात बंदी होती. त्यामुळे खेळला नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक होणार असल्याने प्लेइंग ११मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. यामुळे मागच्या प्लेइंग ११ मधील दोन खेळाडूंवर टांगती तलवार आहे.
IPL 2025 : केकेआरने खोलले विजयाचे खाते, डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानची शरणागती
आयपीएल २०२५ स्पर्धेतही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मात्र हा पराभव विसरून मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागला आहे, असे असताना दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात बदल होणार हे निश्चित आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचे कमबॅक होणार असल्याने संघात बदल होणार.