Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीAmravati Central Bank Fire : अमरावतीमधील सेंट्रल बँकेच्‍या इमारतीला आग; लाखो रुपयांच्‍या...

Amravati Central Bank Fire : अमरावतीमधील सेंट्रल बँकेच्‍या इमारतीला आग; लाखो रुपयांच्‍या नोटा जळून खाक!

मुंबई : अमरावतीमधील (Amravati News) चांदूर रेल्‍वे येथील सेंट्रल बँकेच्‍या इमारतीला भीषण आग (Amravati Central Bank Fire) लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांच्‍या नोटा आणि फर्निचर भस्‍मसात झाले आहे. सुदैवाने या आगीत कसलीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचे शर्थीचे प्रयत्‍न सुरु होते.

National Park Fire : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामांचा प्रताप

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँकेच्‍या चांदूर रेल्‍वे येथील शाखेत नियमित कामकाज सुरू असताना दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास एका ठिकाणाहून धूर निघत असल्‍याचे निदर्शनास येताच पळापळ झाली. ग्राहक आणि बँकेतील कर्मचारी लगेच बाहेर पडले. आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. (Amravati Central Bank Fire) आगीच्‍या घटनेची माहिती चांदूर रेल्‍वे नगर परिषदेच्‍या अग्निशमन दलाला देण्‍यात आली. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्‍थळी पोहोचले. आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले. आग आटोक्‍यात येत नसल्‍याचे पाहून तिवसा आणि धामणगाव रेल्‍वे येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्‍यात आले.

आगीची माहिती मिळताच घटनास्‍थळी बघ्‍यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी देखील तत्‍काळ पोहचून बंदोबस्‍त वाढवला.बँकेतील एसी मध्‍ये शॉर्ट सर्किट झाले आणि तेथून ही आग पसल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. आगीत नेमके मालमत्‍तेचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, घटनास्थळ नजीकचे सर्व दुकाने बंद करण्यात आले होते. आग लागल्याच्या अर्धा तासानंतर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येऊन संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले. (Amravati Central Bank Fire)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -