वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला फोटो झाला व्हायरल

 प्रति तास १६० किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर ट्रेन तयार झाली आहे.

 २०२५ मध्ये प्रवाशांना या रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे.

रेल्वे कोच फॅक्ट्ररीतून रेल्वे बाहेर पडली असून, आता तिची चाचणी होणार आहे.

बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप आयसीएफ चेन्नईवरून आरडीएसओच्या चाचणी रवाना झाला आहे.

नवी वंदे भारत स्लीपर ट्रेनची बांधणी बीईएमएल आणि इंटिग्रल कोच फॅक्ट्री (ICF) यांनी संयुक्तपणे केली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाईपचे फोटो शेअर करत याची माहिती दिली.