Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीSambhaji Bhide : 'नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही'...संभाजी भिडे पुन्हा बरळले

Sambhaji Bhide : ‘नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही’…संभाजी भिडे पुन्हा बरळले

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गणपती, नवरात्र सणाला आलेल्या उत्सवी स्वरूपावर बोलताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले आहे. सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस नवरात्र उत्सवानिमित्त आजपासून सुरुवात झालीय. या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी सध्या साजरे केले जाणाऱ्या सण – उत्सवाच्या उत्साह आणि पद्धतीवर टीका केली आहे. नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, नवरात्रीचे वाटोळं होऊ द्यायचे नाही, असे संभाजी भिडे यांनी ठणकावल आहे. माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले. तसेच चीनने भारतावर १९६२ला आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चिनी भाई भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला यांच्यासारखी दुर्देवी गोष्ट नाही असे देखील भिडे यांनी म्हटलंय.

नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही : संभाजी भिडे

संभाजी भिडे म्हणाले, मी नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही. माता भगिनींची काही इच्छा झाली दौडीत सहभागी होण्याची… हे स्वभाविक आहे. मात्र, पाच वर्षाची मुलगी देखील या दौडीत सहभागी होणार नाही. स्वतंत्र दुर्गा दौड महिलांसाठी काढायची, या दौडीत मात्र यायचे नाही. या सर्वाचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करु द्यायचे नाही. सामाजिक कार्यक्रम आहेत सगळे ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक यासाठी राबवले जात आहे. त्या दौडीचा आपल्याला नाश करु द्यायचा नाही.

पोलिस अधिकाऱ्यांना मी सूचवणार आहे की, आम्ही जनावरे आणि आमच्या पाठीवर हाकत चालले गुराखी असे पोलीस लोक आहेत. पोलीसांनी डोक्याला घातलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पळलचं पाहिजे ही दुर्गा माता दौड आहे. या जमावात त्यांनी धावलेच पाहिजे, असे देखील संभाजी भिडे म्हणाले.

महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात: संभाजी भिडे

संभाजी भिडे पुढे म्हणाले की, ७६ राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावर आक्रमण केली. ते आता पाठलाग करतायत आपण पाय लाऊन पळत आहोत. हिंदी – चिनी भाई भाई असं म्हणणारा पंतप्रधान दुर्दैवाने आपल्याला मिळाला. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात..राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण क्षुद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहे. आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

 

 

 

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -