मुंबई: जिओने नुकतेच आपले पोर्टफोलिओ अपडेट केले आहे. कंपनीने प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर नवे प्लान्स लाँच करण्यास सुरूवात केली आहे. किंमतीमध्ये वाढ केल्यानंतर कंपनीने OTT बंडल प्लान्स काढून टाकले आहेत. आता जिओने OTTचे फायदे देणारे तीन नवे प्लान्स लाँच केले आहेत.
कंपनीने ३२९ रूपये, ९४९ रूपये आणि १०४९ रूपयांचे तीन प्लान्स लाँच केले आहेत. या रिचार्जमध्ये युजर्सला विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळेल.
३२९ रूपयांचा प्लान
३२९ रूपयांच्या जिओच्या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.
अतिरिक्त फायदे काय?
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास युजर्सला जिओ सावन प्रोचा अॅक्सेस मिळतो. यात अनलिमिटेड 5जीचा डेटा मिळणार नाही.
९४९ रूपयांचा प्लान
९४९ रूपयांच्या जिओच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासोबत यात अनलिमिटेड ५ जी डेटाही मिळतो.
यात युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससोबत Disney+Hotstar चा तीन महिन्यांचा अॅक्सेस मिळेल.
१०४९ रूपयांचा प्लान
१०४९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १००एसएमएससोबत येतो.