मुंबई: भारताने २९ जूनला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत इतिहास रचला होता. टीम इंडियाचे अधिकतर खेळाडू आतापर्यंत आपापल्या घरी परतले आहेत. मात्र हार्दिक पांड्या आता आपले शहर वडोदरामध्ये परतला आहे. ज्या पद्धतीने टीम इंडियाने मरीन ड्राईव्हवर एका ओपन बसमध्ये बसून रोड शो केला होता त्याच पद्धतीने हार्दिकने वडोदरामध्ये ओपन बसमधून हजारो चाहत्यांचे अभिवादन स्वीकार केले.
हार्दिक पांड्याचा हा रोड शो मांडवी येथून सुरू होत लहरीपुरा, सूरसागर आणि डांडिया बाजार येथून नवलखी कंपाऊंड येथे संपला. हार्दिक टीम इंडियाच्या विनिंग जर्सीमध्ये दिसला. त्याच्या बसवर वडोदराचा गौरव असे लिहिले होते.
VIDEO | Cricketer Hardik Pandya (@hardikpandya7) attends a roadshow in Vadodara to celebrate Team India’s T20 World Cup victory. pic.twitter.com/Qp4rFg3Mxl
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2024
वडोदराच्या रस्त्यांवर चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हार्दिकचा रोड शो ५ वाजता सुरू होणार होता मात्र हार्दिक ६ वाजता बसमध्ये बसला. या रोड शो दरम्यान वंदे मातरमही वाजवण्यात आले. हार्दिकची एक झलक मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने वडोदरामध्ये लोक आपापल्या फोनमधून फोटो काढताना दिसत होते.
काही वेळाने कृणालनेही केले जॉईन
काही वेळ हार्दिक पांड्या ओपन बसमधून लोकांना अभिवादन करत होता. मात्र काही वेळाने त्याचा भाऊ कृणाल पांड्याही बसमध्ये आला. कृणाल काळे टी शर्ट आणि काळी पँट या गेटअपमध्ये दिसला.