Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Local : मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक

Mumbai Local : मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक

प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई : मुंबईकरांची लाइफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने अनेक अपडेट समोर येत असतात. काल कसारा (Kasara) स्टेशनजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे कल्याण दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला होता. अशातच रेल्वे प्रशासनाने आज पश्चिम मार्ग (WR) तर उद्या मध्य (CR) आणि हार्बर रेल्वे (HR) मार्गावर मेगाब्लॉक (Railway Megablock) जारी केला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक रेल्वे उशिराने धावणार असून काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडा, असे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेच्या दरम्यान मध्य मार्गावरील ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सर्व ट्रेन डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यासोबत मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर रेल्वेमार्गावरील हे बदल

हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Line) कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर देखील रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.

त्याचबरोबर सीएसएमटीकडून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तर या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -