अहमदनगरच्या एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट
अहमदनगर : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी अहमदनगरच्या एल्गार मेळाव्यात केला. १७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
तर जिथे ओबीसी लोक राहतात. तिथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. न्हावी समाजाच्या दुकानात जायचे नाही असे ठरविले. सर्व नाभिक समाजाने ठरवा एकही मराठा समाजाची कटिंग करायची नाही. तसेच खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू असल्याचा आराेप देखील त्यांनी यावेळी केला.