नवी दिल्ली : मोदी सरकारची(modi government) भूमिका स्पष्ट असून देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. त्या व्यक्ती, संघटनांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (उप्पा) ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटरवर कारवाईची माहिती दिली.
गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ला उप्पाअंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. ‘ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे शहा यांनी म्हटले.