लखनऊ: विश्वचषकातील पहिलावहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका(srilnaka) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ५ विकेटनी हरवले. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी तसेच ३५.२ षटकांत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील हा पहिलाच विजय आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला अद्याप खाते खोलता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला याआधी भारत आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघावर चहूबाजूंनी टीका होत होती. अखेर त्यांना विजयाचा सूर गवसला.
भक्कम सुरूवात मात्र…
या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ २०९ धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. श्रीलंकेची सलामीची जोडी पथुम निसांकाने ६१ धावा केल्या तर कुसल परेराने ७८ धावांची खेळी केली. या दोघांनी संघाला भक्कम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली.
मात्र बाकी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. चरिथ असलंकाने २५ धावांची खेळी करत सामन्यात थोडीफार हातभार लावला. मात्र इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव २०९ धावांवर आटोपला.
शंभरीच्या आत गमावले तीन विकेट
दुसरीकडे २१० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला २४ सलग दोन धक्के बसले. ऑस्ट्रेलियाने शतक गाठण्याआधीच आपले ३ गडी गमावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा विजय साकारणार का यात थोडी शंकाच वाटत होती. मत्र त्यानंतर मार्नस लाबुशग्ने आणि जोश इग्निस यांनी डाव सावरत चांगली भागीदारी रचली. यामुळे ऑस्ट्रेलियाला हा विजय साकारता आला.