नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. २० जुलै ते ११ ऑगस्ट असे २३ दिवस संसदेचे अधिवेशन सुरु आहे.
आज अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आणि कोणते विधेयक मंजूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व खासदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदान ते कर्तव्य पथापर्यंत मोटारसायकलवरुन ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.