Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीVande Bharat express : पंतप्रधान मोदी आज करणार मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे...

Vande Bharat express : पंतप्रधान मोदी आज करणार मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन

मडगाव, गोवा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मडगाव येथून २७ जून रोजी या ट्रेनचे सकाळी १०:१५ वाजता उद्घाटन होणार आहे. मडगाव ते सीएसएमटी मुंबई उद्घाटनाची ट्रेन धावणार आहे. या उद्घाटन समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आठ डब्यांची नवीकोरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून मडगाव येथे रविवारीच दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील या पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाची जोरदार तयारी गोव्यात मडगाव येथे करण्यात आली आहे.

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांबद्दल ती महागडी असल्याबाबत एकीकडे चर्चा होत आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावर उद्घाटन होण्याआधीच आरक्षण खुले झाल्यानंतर गणेशोत्सवातील चार दिवसांचे वंदे भरत एक्सप्रेसचे आरक्षण हाऊसफुल्ल देखील झाले आहे.

वंदे भारत एक्सप्रेस २८ जून म्हणजे बुधवारपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित स्वरूपात आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. यासाठीचे आरक्षणही सुरू झाले आहे. प्रवाशांकडून त्याला प्रतिसादही मिळू लागला आहे. आठ डब्यांच्या असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ५३० प्रवाशांची आसनक्षमता आहे. पहाटे ५.२५ वा. ही ट्रेन सीएसएमटी स्थानकातून सुटणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम व मडगाव असे थांबे देण्यात आले आहेत. या ट्रेनमधून कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची उत्सुकता अनेक पर्यटक आणि प्रवाशांना लागून राहिली आहे. लार्ज विंडो, मूव्हिंग चेअर्स, स्वयंचलित डोअर्स, सेन्सर्स आदी अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा असलेली पूर्णपणे वातानुकूलित असलेली ही सुसज्ज गाडी आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर

> मुंबई ते मडगाव- १८१५ रुपये
> मुंबई ते रत्नागिरी – ११२० रुपये
> पनवेल ते रत्नागिरी – १०१० रुपये
> मुंबई सीएसएमटी ते कणकवली – १३६५ रुपये
> मुंबई सीएसएमटी ते खेड – ८८० रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -