केंद्रीय मंत्र्यासह २ भाजप आमदार करत होते प्रवास
गुवाहाटी : आसाममधील गुवाहाटीमधून दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो विमानचे इमर्जन्सी लँडीग करावा लागले. विमानाच्या पायलटने इंजिनमध्ये समस्या असल्याचे जाहीर केल्यानंतर गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या फ्लाइटमध्ये केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री आणि भाजपचे दोन अमदार देखील प्रवास करत होते.
गुवाहाटीकडे वळवण्यापूर्वी दिब्रुगड विमानतळावर विमान १५ ते २० मिनिटे हवेतच राहिले. त्यानंतर अखेर गुवाहाटी विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासह १५० हून अधिक प्रवासी विमानात प्रवास करत होते. दरम्यान विमानाचे लँडिंग झाल्याने मोठा अनर्थ टळला.