Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेडॉक्टरच करायची नवजात बाळांची खरेदी - विक्री

डॉक्टरच करायची नवजात बाळांची खरेदी – विक्री

उल्हासनगरमध्ये डॉक्टरसह पाच जणांना अटक

उल्हासनगर : उल्हासनगरमधील एक महिला डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी – विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममधील डॉ. चित्रा चेनानी या आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळांची खरेदी – विक्री करत होत्या. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. चित्रा चैनानीसह, बेळगांव मधील देमांना कमरेकर, संगीता वाघ,गंगा योगी, प्रतिभा मगरे यांना अटक करण्यात आली आहे.

सामाजिक संस्थांनी माहिती मिळताच बनावट ग्राहकांच्या माध्यमातून या प्रकारचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या २२ दिवसांच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट या महिला डॉक्टरने ठरविले होते. आज २२ दिवसांच्या बाळाची विक्री ७ लाखांत होणार होती. दरम्यान, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळांची विक्री करणाऱ्यांमध्ये हे रॅकेटमध्ये सहभागी आहे. या टोळीकडून अजून किती बाळांची विक्री करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -