मुंबई (प्रतिनधी) : आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने हा गुन्हा दाखल केला असून वानखेडे यांच्याशी संबंधित सात ठिकाणी सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते. या प्रकरणात वानखेडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये मुंबईसह दिल्ली, कानपूर आणि रांचीतील ठिकाणांचा समावेश आहे.
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
सीबीआयची छापेमारी
