Thursday, April 24, 2025
Homeक्रीडासामना ड्रॉ, पण भारताचा मालिकाविजय

सामना ड्रॉ, पण भारताचा मालिकाविजय

सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरले नाव

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : फलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी धावांचा डोंगर उभारल्यामुळे ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ मालिकेतील चौथा सामना सोमवारी अनिर्णित राहिला. अशा स्थितीत भारताने ही मालिका २-१ ने खिशात घातली. दरम्यान मालिका विजयासह भारताने घरच्या मैदानावर सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कांगारुंविरुद्ध सलग चार कसोटी मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ ठरला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा संघ आपला दुसरा डाव २ फलंदाज गमावत १७५ धावांवर घोषित केला. सामन्याचा निकाल लागत नसल्याने दोन्ही संघांनी परस्पर संमतीने सामना संपवल्याची घोषणा केली. घोषणा झाली तेव्हा मार्नस लाबुशेन ६३ आणि स्टीव्ह स्मिथ १० धावांवर नाबाद परतले.

सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने ४८० धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या शतकाच्या मदतीने ५७१ धावा करत ९१ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने १७५ धावा केल्या. अखेर मालिकेतील हा चौथा सामना अनिर्णित राहिला.

तत्पूर्वी भारताच्या विराट कोहलीने सामन्याचा चौथा दिवस गाजवला. त्याने १८६ धावांची मॅरेथॉन खेळी खेळत कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवला. विराटने १८६ धावा केल्या. तर शुभमन गिलने १२८ धावा जमवल्या.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाच्या अखेरपर्यंत फलंदाजी सुरू ठेवली आणि २ गडी गमावून १७५ धावा केल्या. सामना अनिर्णित घोषित होण्यास सुमारे एक तासाचा खेळ शिल्लक होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -