नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची गेल्या आठ तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आलीय.
विशेष म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. सिसोदिया यांच्यावर राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. अखेर त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मनीष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना किती दिवसांची कोठडी दिली जाते ते कळेल.