काठमांडू (वृत्तसंस्था): आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नेपाळमध्ये जुमला या ठिकाणापासून ६९ किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप ५.२ रिश्टर स्केलचा होता आणि त्याची खोली १० किलोमीटर इतकी होती त्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्येही ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंप होत आहेत. यापूर्वी २४ जानेवारी रोजी नेपाळमध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, नेपाळमध्ये ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, बुधवारी डोटी जिल्ह्यात घर कोसळून झालेल्या घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला.
Earthquake of Magnitude:4.4, Occurred on 22-02-2023, 13:30:23 IST, Lat:29.56 & Long:81.70, Depth: 10 Km ,Location: 143km E of Pithoragarh, Uttarakhand, India for more information Download the BhooKamp App https://t.co/MNTAXJS0EJ@Dr_Mishra1966 @Ravi_MoES @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/ovDBNhb7VO
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 22, 2023
सध्या तुर्की आणि सिरियामध्येही नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे भीषण परिस्थीती आहे.