सिंधुदुर्ग: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.३० वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने, टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद. स्थळ, टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला येथे आगमन व कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी १२ वाजता मोटारीने वेंगुर्ला बंदरकडे प्रयाण. दुपारी १२.१० वाजता वेंगुर्ला बंदर येथे आगमन. दुपारी १२.१५ वाजता वेंगुर्ला बंदर येथील झुलत्या पुलाचा व निशांत तलाव टप्पा-२ च्या लोकार्पणाला उपस्थिती. स्थळ, वेंगुर्ला बंदर. दुपारी १.०५ वाजता मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी १.३५ वाजता चिपी विमानतळावरून विमानाने जळगावकडे प्रयाण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
