नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहा:कार माजवला आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या
आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे, तसेच या बैठकी दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. जगात आठवडाभरातच कोरोनाची ३६ लाख रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.
भारती पवार म्हणाल्या, भारतात दोन वर्षापूर्वी कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला होता. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात आज त्याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होण्यास सुरुवात होणार आहे. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती वेशीवरच थोपवण्यासाठी आज केंद्राची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे.