Wednesday, May 1, 2024
Homeमहामुंबईभांडुपमध्ये दिग्गज कलाकारांच्या समवेत सजणार मराठी रंगभूमी दिन

भांडुपमध्ये दिग्गज कलाकारांच्या समवेत सजणार मराठी रंगभूमी दिन

माध्यम प्रयोजक दैनिक प्रहार

किशोर गावडे

मुंबई : सर्व कलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणजे ५ नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिवस. सर्व कलाकारांसाठी हा दिवस खुप विशेष असतो. ज्या रंगभूमीमुळे आपल्याला कलाकार ही पदवी प्राप्त झाली. त्या मराठी रंगभूमीने दिलेले अमूल्य क्षण आम्हा कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरतात. अशा रंगभूमीला धन्यवाद बोलण्याचा, तिचे ऋण फेडण्याचा हा आनंदाचा दिवस, असे गौरवोद्गार भांडुपचे कलाकार स्वरूप‌ शशिकांत सावंत यांनी माध्यमांशी बोलताना काढले.

५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवसाचे औचित्य साधून स्वरू एंटरटेनमेंट (Swaru Entertainment) या संस्थेने रंग कलेचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी कोकण नगर पटांगण, कोकण नगर व्यायाम शाळा, भांडुप पश्चिम येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात नृत्य, एकपात्री अभिनय, मिमिक्री, गायन अश्या अनेक कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळतील.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री दळवी व खारी बिस्कीट चित्रपटातील बालकलाकार आदर्श कदम तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकार, ख्यातनाम आंतरराष्ट्रीय निवेदक किरणजी खोत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दैनिक प्रहार आहे.

भांडुप म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांचे वास्तव्य असणारं शहर आणि या भागात अनेक सांस्कृतिक संस्था कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचपैकी अवघ्या काही दिवसांत प्रसिद्धीस आलेली संस्था म्हणजे स्वरू एंटरटेनमेंट. ही संस्था गेल्या वर्षी ५ जानेवारी २०२१ ला अभिनेता लेखक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस येणाऱ्या आणि कलेसाठी झोकून दिलेल्या अवलीया कलाकार स्वरुप शशिकांत सावंत यांनी प्रकाश गोडे, निखिल चव्हाण, शुभदा गावडे, ज्योतीस्नेहा वालावलकर, प्रशांत देशमुख, देवानंद खरात आणि रिमा म्हापसेकर या कलाकार सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली आणि उत्कृष्ट पथनाट्य, वेगवेगळ्या विषयांवर आधारित शॉर्ट फिल्म, आपल्या संस्थेतील विद्यार्थी कलाकारांना सिरीयल मध्ये संधी उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींमुळे ही संस्था नावारूपाला आली.

या वर्षी या संस्थेला महाराष्ट्र कला उर्जा पुरस्कार जाहीर झाला तसेच ‘सन्मान शहिदांचा’ या शॉर्ट फिल्मला बेस्ट मराठी फिल्म म्हणून International Award मिळाला.

मराठी रंगभूमीने दिलेले अमूल्य क्षण आम्हा कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरतात. आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती रंगकर्मी निखिल चव्हाण आणि स्वरू एंटरटेनमेंट संस्थेतील प्रत्येक कलाकाराने केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -