Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीआरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

जानेवारीत जाहिरात, मार्चमध्ये परीक्षा!

मुंबई : आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघालेली होती. त्यावेळी साडे अकरा लाख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही. परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

दरम्यान, कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -