मसुरे (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी मंगलमय कार्यकाळात मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीने महाआवास अभियान २०२१/२२ ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गोळवण ग्रामपंचायतीने या योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सरपंच सुभाष
लाड, उपसरपंच साबाजी गावडे व ग्रामसेविका एम एम कामतेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जि. प. सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा समारंभ होणार आहे.
गोळवण ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत द्वितीय क्रमांक कणकवली तालुक्यातील बोर्डवे ग्रामपंचायत तर तृतीय क्रमांक मालवण तालुक्यातील राठीवडे ग्रामपंचायतला जाहीर झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत प्रथम वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ तर द्वितीय मालवण तालुक्यातील खरारे पेंडुर, तृतीय क्रमांक देवगड तालुक्यातील मीठमुंबरी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.