Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीबनावट दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, १० अटकेत

बनावट दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, १० अटकेत

अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात दारूबंदी असतानाही बनावट दारू विक्री प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण रुग्णालयात दाखल आहेत.

गुजरातच्या होताडमधील रोजित गावात रविवारी झालेल्या या घटनेनंतर सोमवारी प्रशासनाने याची दखल घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३० जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश जण भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या दुर्घटनेचे वृत्त गांधीनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -