Friday, April 25, 2025
Homeकोकणरायगडपोलादपूरमध्ये खैर तस्कर जेरबंद; वनविभागाची कारवाई

पोलादपूरमध्ये खैर तस्कर जेरबंद; वनविभागाची कारवाई

पोलादपूर : वनविभाग पोलादपूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाच आठवड्यात दोन वेळा केलेल्या कारवाईत दोन ट्रकसह पावणेदोन लाखांच्या मालासह दोन ट्रक असा एकूण १६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. अवैध लाकूडतोडी व खैर तस्करांना पोलादपूर हद्दीत जेरबंद केल्याने महाड व पोलादपूर तालुक्यातील वनमाफियांना चांगलीच चपराक बसली आहे.

रोहे येथील उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव तसेच महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीवरून, पोलादपूर परिमंडळ वनअधिकारी शाम गुजर, वनरक्षक प्रशांत गायकर, नवनाथ मेटकरी, दिलीप जंगम, सचिन मेने, नीलेश नाईकवाडे, प्रियांका जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर शहराबाहेर असणाऱ्या वनउपज तपासणी नाका येथे २९ एप्रिल रोजी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वृक्षतोडीच्या विनावाहतूक परवान्याचे आकेशिया घनमीटर १३.५८७ आकाराचे ५४ नग किंमत ५० हजार ४९० रुपये व ट्रक अंदाजे किंमत ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी झाकिउद्दिन हुसेन (रा. त्रिपुरानाथ) व हावप्पा ऊर्फ अविनाश चिंचोलीकर (रा. त्रिपुरानाथ, कर्नाटक) या दोघांवर वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -