मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि महू दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये ०१०५१ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर गुरुवारी ही गाडी ०५.१५ वाजता सुटेल व महू येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल, तर ०१०५२ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या महू येथून ३० एप्रिल २०२२ ते २ जुलै २०२२ अशा १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर शनिवारी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर, बनारस आणि वाराणसी असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना ही एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशा प्रकारची आहे.