Tuesday, April 29, 2025
Homeदेशकथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन

कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन

नवी दिल्ली : प्रथितयश कथ्थक नृत्यकार पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते आणि उपचार घेत होते. रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हसमुख चेहरा सतत लक्षात राहील – नात रागिणी

महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर नात रागिणी यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बिरजू महाराज त्यांना नूतन तंत्रज्ञान आणि उपकरण यांची प्रचंड आवड होती. जर नृत्यकार नाही तर तंत्रज्ञ झालो असतो असे ते म्हणायचे. त्यांचा हसमुख चेहरा सतत लक्षात राहील असे रागिणी म्हणाल्या.

पंडित बिरजू महाराजांनी भारतीय नृत्यकलेला जगात पोहचविले : पंतप्रधान मोदी

बिरजू महाराज यांचा परीचय

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.

विविधांगी व्यक्तिमत्व

पंडित बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते. याशिवाय वादक, कविता लिहिणे आणि चित्रेही काढत असत. त्यांचे अनेक शिष्य आता सुप्रसिद्ध कलाकार आहेत आणि जगभर पसरलेले आहेत.

पुरस्कार, नृत्य दिग्दर्शन

१९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनही केले. ज्यामध्ये उमराव जान, देढ इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय सत्यजित राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमातही त्यांनी संगीत दिले होते. पद्मविभूषण व्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील मिळाला आहे. २०१२ मध्ये त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली. २०१६ मध्ये बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्याला नृत्य दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -