वाडा (वार्ताहर) : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्याच्या संघात वाडा तालुक्यातील दोन मुलींची निवड झाली आहे. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वृषाली कवठे व अंकिता हिरकुडा यांची पालघर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे.
यापूर्वी देखील स्वामी विवेकानंद शाळेतील सरिता शनवारे, दक्षता प्रधान, उज्ज्वला मुकणे व प्रणाली कोलेकर यांनी राज्यस्तरावर सहभाग नोंदवला आहे. सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत वाड्यातील या मुली पालघर जिल्ह्याच्या वतीने खेळणार आहेत.
निवड झालेल्या या खेळाडूंवर वाडा तालुक्यातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खेळाडूंना शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस भ. भा. जानेफळकर यांचा पाठिंबा, शाळेचे मुख्याध्यापक बा. ज. शिंदे व क्रीडा शिक्षक राकेश ठाकरे, हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.